या वेबसाईटवर घरबसल्या पहा लोकसभा मतमोजणीची प्रत्येक अपडेट; निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली वेबसाईट

Foto
औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आता अवघ्यात काही तासांवर येऊन ठेपली आहे. यावेळी मराठवाड्यातील काही जागांवर अतिशय चुरशीच्या लढती होत आहे. औरंगाबाद, बीड आणि नांदेड या तीनही जागांच्या निकालाची मोठी उत्सुकता राज्यभर लागलेली दिसते. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना मतमोजणीच्या प्रत्येक फेरीची माहिती मिळावी यासाठी निवडणूक आयोगाने एक वेबसाईट तयार केली आहे. त्यामुळे मतदारांना आता घरबसल्या निवडणुकीचा निकाल पाहता येईल.

 राज्य निवडणूक आयोगाने suvidha.eci.gov.in ही वेबसाइट तयार केली आहे. या वेबसाईटवर प्रत्येक मतदार संघाच्या मतमोजणीची खडा न खडा माहिती अपडेट होणार आहे. प्रत्येक फेरीच्या मतमोजणीची आकडेवारी या वेबसाईटवर पाहता येईल. याशिवाय मोबाईलवर वोटर हेल्पलाइन ॲप डाऊनलोड करून निकालाची माहिती मिळवता येणार असल्याचे आहे.

 चुरशीच्या लढतीकडे लक्ष 
या वेळची लोकसभा निवडणूक अतिशय अटीतटीची झाली.  सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी झंजावती प्रचार दौरे करून वातावरण ढवळून काढले. मराठवाड्यातील नांदेड लोकसभेच्या जागेसाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तर बीड मतदारसंघात उमेदवार प्रीतम मुंढे यांच्यासाठी ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याच बरोबर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद मतदारसंघात या वेळी चौरंगी लढतीने निकालाचा अंदाज भल्याभल्यांना आलेला नाही. या तीनही मतदारसंघातील निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळेच क्षणाक्षणाची माहिती मिळवण्यासाठी आकाश पाताळ एक केले जाईल, यात शंका नाही. निवडणूक आयोग वेबसाईट आणि ॲप द्वारे प्रत्येक फेरीची अपडेट माहिती याद्वारे देणार आहे. घरबसल्या ही माहिती सदर वेबसाईट आणि ॲप वर पाहता येईल, असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाने suvidha.eci.gov.in ही वेबसाइट आणि वोटर हेल्पलाइन सर्वसामान्यांसाठी माहिती मिळावी यासाठी तयार केले आहे. या दोन्ही पद्धतीने मतदारांना प्रत्येक फेरीची माहिती घरबसल्या मिळू शकेल. निवडणूक आयोगाने सर्वसामान्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

 -निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रिंगी

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker